vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशारा. “काँग्रेसला निडर लोकांची गरज, काँग्रेस  खासदार राहुल गांधी.

काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशारा. “काँग्रेसला निडर लोकांची गरज, काँग्रेस  खासदार राहुल गांधी.

प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. काँग्रेस सोडणारे नेते RSS ची माणसं आहेत. काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको. अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावलं आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.

काँग्रेसला निडर लोकांची गरज, डरपोकांनी बाहेर जावं

खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे असं त्यांनी सांगितले.

खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावं. तुमची गरज नाही, RSS मध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे असं राहुल म्हणाले

संबंधित पोस्ट

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणूक २०२४ – चौथा टप्पा: ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान..

राज्यात 5297 उमेदवारांचे पोलीस प्रशिक्षण सुरु- देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर..

vishwatmaklokswamivarta

प्रभादेवी येथे गणेश मूर्ती विसर्जनाच्या दरम्यानची घटना ,ठाकरे गटाला जशास तसे उत्तर द्या; मुंबईतल्या राड्यानंतर एकनाथ शिंदेंचे आदेश

vishwatmaklokswamivarta

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta