vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन

 

सातारा प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा व जावली तालुक्यात दिव्यांगाना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमाप घेवून ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करणेत आलेले आहे. या शिबीरासाठी सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10 वा जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे जास्तीत जास्त अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थीनी स्वखर्चाने उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन, सातारा पंचायत समिती गटविकास अधिकारी (नि. श्र.) सतिश बुध्दे यांनी केले आहे. शिबीरास येताना लाभार्थ्याने आधार कार्ड, रेशनकार्ड, वैदयकीय प्रमाणपत्र, युडी आयडी कार्ड यांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रती आणाव्यात, असेही प्रसिध्दीपत्रकात कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ;प्रलंबित अर्जदारांना हजर राहण्याचे आवाहन

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत