vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा..

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा..

  छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- टोयोटा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम करण्यात येणार असून तत्संबंधी अधिक तपशिल महिना अखेर होणाऱ्या सामंजस्य कराराच्या वेळी स्पष्ट केला जाईल.

यासंदर्भात आज टोयोटा संस्थेचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगिता राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.

झालेल्या चर्चेनुसार, टोयोटाची प्रकल्प उभारणी होत असून लवकरच आपल्या उद्योग क्षेत्रात कंपनीच्या ध्येय्यधोरणानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सामाजिक हिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यात बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम ही संस्था करणार आहे. अत्याधुनिक शाळेची उभारणी यानिधीतून कंपनी करुन देणार आहे. त्यासाठी या महिनाअखेर जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करारही केला जाणार आहे. त्यावेळी अधिक तपशिल देण्यात येईल,असे सोनटक्के यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीचीयात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओइ) गांधीनगर येथे एकात्मिक क्रीडा पायाभूत सुविधांचे उद्घाटन

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय आराखड्याची नांदीबालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक; शिक्षण, क्रीडा, कला व कौशल्य विकासावर भर