vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यातील खासगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा, तुकड्या आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपये इतक्या खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी  विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, या निर्णयाच्या राज्यातील खासगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत ६ हजार ७५ शाळा आणि ९ हजार ६३१ तुकड्यांमधील ४९ हजार ५६२ शिक्षकांना लाभ होणार आहे. याशिवाय २ हजार ७१४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे वेतन अनुदान १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे.

तसेच अनुदानाच्या निकषानुसार अपात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसहाय्यीत अधिनियमांच्या तरतूदीनुसार विवक्षित शाळा म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार

vishwatmaklokswamivarta

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

विशेष लेख / ५ जून जागतिक पर्यावरण दिन  पर्यावरणाचा जागर घराघरातून वाढवूया ! 

बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी