vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी :- राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाय योजना आणि सागरी किनाऱ्यावरील अवैध धंद्यांवर करण्यात आलेली कारवाई यामुळे राज्यातील सागरी मत्स्योत्पादनामध्ये तीन हजार मेट्रिक टन वाढ झाल्याची माहिती मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते.

 

  सागरी सुरक्षा आणि मत्स्योत्पादन वाढ या दोन गोष्टीवर शासन लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, गस्ती नौकांच्या माध्यमातून १ हजार १६५, ड्रोनच्या माध्यमातून १ हजार ८०३, आणि पावसाळी मासेमारी उल्लंघन प्रकरणी ३६ याप्रमाणे गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. मासेमारीला १०० टक्के कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. मिरकर वाडा, रत्नागिरी येथे २२ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येत आहेत. कोकणातील प्रवास सोपा व्हावा यासाठी ‘एम टू एम’ रो रो सर्व्हिस येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येत आहे. तारापूर मत्स्यालयासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जागतिक दर्जाचे मत्स्यालय तयार करण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून ‘आय टी आय’ मध्ये या विषयी कोर्स सुरू करण्यात येत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

 

००

संबंधित पोस्ट

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन,कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…