vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चॅटबॉट’ सेवेतून घरबसल्या मिळवा समाजकल्याण व मनरेगा योजनांची माहिती* 

*‘चॅटबॉट’ सेवेतून घरबसल्या मिळवा समाजकल्याण व मनरेगा योजनांची माहिती*

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांनी घरबसल्या मनरेगा व समाजकल्याण विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण चॅटबॉट सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. फक्त “Hi” असा संदेश 8275309343 या क्रमांकावर पाठवल्यास विविध योजनांची माहिती आणि अर्जाचे नमुने सहज मिळू शकणार आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती सहज आणि पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला मोठे यश मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.

आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दिव्यांग कल्याण समितीच्या बैठकीत या अभिनव चॅटबॉट सेवेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजीत यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजीत राऊत उपस्थित होते.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी सांगितले की, या चॅटबॉट सेवेच्या माध्यमातून मनरेगा व समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांची सुस्पष्ट माहिती, अर्ज प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, ही सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेला केवळ दोन हजार रुपयांचा खर्च आल्याचेही त्यांनी नमूद केले

*दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय*या बैठकीत दिव्यांग नागरिकांच्या हितासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन, तसेच आगामी निवडणुकांमध्ये दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुलभता निर्माण करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

*दिव्यांग पुनर्वसन केंद्राची पाहणी*

या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आवारातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.बैठकीला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक..