vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..

जालना,  (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे लोकप्रिय व दूरदृष्टीचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच जालना जिल्ह्याच्या कार्यसमर्पित पालकमंत्री मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भव्य महा रक्तदान अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या महाअभियानाचे नेतृत्व भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व “एक थेंब रक्त, एक जीव वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हे रक्तदान शिबिर राबविले जात आहे. हे शिबिर गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.22 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत नवीन जालना मंडळाचे शिबिर भाजपा कार्यालय, जालना येथे व ग्रामीण जालना मंडळाचे शिबिर नाव्हा, ता. जालना येथे होणार आहे. 23 जुलै रोजी पूर्व जालना मंडळाचे शिबिर रुपम हॉल, हॉटेल मधुबनच्या मागे, छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना येथे, तर 24 जुलै रोजी जुना जालना मंडळाचे शिबिर काळुंका माता मंदिर संस्थान सभागृह, गांधी चमण, जुना जालना येथे आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान केल्यानंतर प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व आरोग्य खबरदाऱ्या पाळून शिबिरे आयोजित केली जात आहेत. जालना महानगरातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पुण्यकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

vishwatmaklokswamivarta

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती