vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक-उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक-उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

सातारा प्रतिनिधी वर्धा- अनुकंपा नियुक्तीचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण 17 जुलै 2025 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून नेमून दिलेले आहे. यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांची पूर्व तयारी बैठक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिलीया बैठकीमध्ये प्रतिक्षासुची अद्यायावत करणे, गट बदलणे, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची परिगणना करणे, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पूनर्जिवीत करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाच पाठविण्याबाबत तयारी करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार आहे. काही विभागांमध्ये गट –क व गट ड संवर्गातील पदांचे नियुक्तीचे अधिकार विभागीय स्तरावर असतात. जरी पद भरतीचे अधिकार विभागीय स्तरावर असले तरी सुध्दा कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या विभागाचे जिल्हास्तरावरील प्रतिनिधी म्हणून अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यक्षेत्राचे कामकाजासाठी उपस्थित रहावे, असे सर्व कार्यालयप्रमुखांना कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा 

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta