vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

 मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या “आपलं मंत्रालय” या गृहपत्रिकेच्या जून २०२५ या अंकाचे प्रकाशन प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते झाले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(प्रशासन) हेमराज बागुल, उपसंचालक(प्रशासन) गोविंद अहंकारी आदी मान्यवर उपस्थित होते

 ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये पर्यावरण धोरण, २०२४ अंतर्गत शासनाची भूमिका, पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती, तसेच, पर्यटनाशी निगडित आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक पर्यटन विकास, व स्थानिक समुदायांच्या सहभागाची भूमिका यावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित प्रवासवृत्तांताचा समावेश या विशेषांकात करण्यात आलेला आहे.                                                     000

संबंधित पोस्ट

राज्य सरकार लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेता कर्मचारी सेने चे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला

vishwatmaklokswamivarta

रणवीर अल्लाबदिया, समय रैना यांच्याविरुद्ध असभ्य वक्तव्यावरून एफआयआर केल्यानंतर आसाम पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta