vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

अंबड । प्रतिनिधी – राज्य शासनाकडून सध्या सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण आहे, या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दलित आदिवासींची जमिनी बळकावून त्यावर उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शिवसेना दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी दिला आहे. ते सोमवार (दि 21) रोजी आयोजित अंबड-घनसावंगी तालुकास्तरीय दलित आदिवासी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी अण्णासाहेब बाळराज, विलासराव खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना अ‍ॅड. मगरे म्हणाले की, शिवसेना दलित आघाडी गेले अनेक वर्षांपासून दलित आदीवासी कास्तपट्टेनावावर करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करीत आहोत. महाराष्ट्र शासनाचा उर्जा प्रकल्प उभारणी सध्या सुरु आहे. शासनाचे धोरण पडीत व खडकाळ जमिनीवर सौर उर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण आहे, मात्र, प्रशासकीय स्तरावर दलित आदिवासी वहिती मशागत केलेल्या उभे पिकांत सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी करीत आहेत. यास शिवसेना दलित आघाडीचा तीव्र विरोध असल्याचे अ‍ॅड. मगरे म्हणाले. गेल्या महिनाभरापासून जालना जिल्ह्यात शिवसेना दलित आघाडीच्यातवीने जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. पोलीसांमार्फत प्रशासन दलित आदिवासी कास्तकरांना धमकावण्याचे काम करीत आहे. मात्र, त्याला आम्ही घाबरत नाही. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करण्याची भूमिका आपली असल्याचेही अ‍ॅड. मगरे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने दलित आदिवासींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेन -:आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

vishwatmaklokswamivarta

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा