vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ..

राज्य प्रतिनिधी-पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज गोव्यात डोना पॉला येथील राजभवनात नवीन दरबार सभागृहात झालेल्या शपथविधी समारंभानंतर गोव्याचे 22 वे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

शपथविधीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रीपरिषद, खासदार, आमदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष चिंताकायला अय्यन्नपात्रडू, आंध्र प्रदेशच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री गुम्मीदी संध्या राणी, राज्यसभा सदस्य सदानंद तानावडे, इतर राजकीय नेते आणि सन्माननीय नागरिक उपस्थित होते.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या राज्यपालांच्या नियुक्तीपत्राचे वाचन मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदवेलू यांनी केले.

अशोक गजपती राजू यांनी त्यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत आणि सामाजिक सेवेत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 2014 साली त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून काम केले आहे. यापूर्वी 1978 मध्ये ते आंध्र प्रदेशातील विझीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. याशिवाय, ते आंध्र प्रदेशातील प्रमुख ट्रस्ट मानस (महाराजा अलक नारायण सोसायटी ऑफ आर्ट्स अँड सायन्स) चे नेतृत्व करत आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या वडिलांनी 1958 मध्ये या ट्रस्टची स्थापना केली होती.

पुसापती अशोक गजपती राजू यांनी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यानंतर गोव्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

संबंधित पोस्ट

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी- अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार