vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पूर्वतयारीबाबत आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते

निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून, 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोईसुविधांचा आढावा घेऊन सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी माहिती दिली.

निवडणूक आयुक्त श्री.वाघमारे म्हणाले की, मतदार यादी तयार करणे हेच या निवडणुकीतील महत्वाचे काम आहे. त्या प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याकडे मतदार यादीचे विभाजन करताना कटाक्षाने लक्ष द्यावे. महानगरपालिकांना आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता करून देण्यात येणार असून साठवणूकीची जागा आणि वापरलेले ईव्हीएम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने वेबसाईट व ॲप अद्ययावत करण्यात आले असून या दोन्हीचा वापर करता येईल. या ॲपचा व वेबसाईचा सर्वसाधारण मतदारालाही वापर करता येणार आहे.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली.यावेळी निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

******

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

भिवंडी व शहापूर तालुक्यातील जनजीवन मिशन योजनांमधील-अडचणी तातडीने मार्गी लावा-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार