vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

*दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

दुबई / मुंबई प्रतिनिधी चित्रपटसृष्टीच्या जगात अमेरिकेचे हॉलिवूड आहे तसे भारताचे बॉलिवूड सुध्दा प्रसिध्द आहे.मुंबईचे बॉलिवूड,हिंदी सिनेसृष्टी या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत.दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दुबई येथे केले.दुबई येथील हॉटेल लॅव्हेंडर मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्डचे वितरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना करण्यात आले.यावेळी दादासाहेब फाळके अवॉर्ड ने ना.रामदास आठवले यांचा ही भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी दादासाहेब फाळके अवॉर्ड चे आयोजक कल्याणजी जाना उपस्थित होते.यावेळी भाजपचे महामंत्री दुष्यंत गौतम,याकुब अली तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत उपस्थित होते.

  दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला.त्यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी मुकपट निर्माण केला.हा सिनेमा भारतातील पहिला सिनेमा ठरला.त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी 95 चित्रपट आणि 26 लघुपट निर्माण केले.भारतीय चित्रपट सृष्टीत दिलेल्या या भरीव योगदानामुळे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक ठरले आहेत.त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

  दादासाहेब फाळके अवॉर्ड चे संयोजक कल्याणजी जाना हे अत्यंत गरिबीतून पुढे आलेले समाजसेवक आहेत.त्यांनी दुबई सारख्या व्यापार आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र ठरलेल्या शहरात हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्या बद्दल ना . रामदास आठवले यांनी कल्याणजी जाना यांचे कौतुक केले.0000

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहिम

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी 

vishwatmaklokswamivarta

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन