vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केली.

सन २०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहे. शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे एक लाख ते २५ हजार रुपये, ग्रामीण भागासाठी ७५ हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना पुरस्कार रक्कम ५०हजार आहेत. विभागस्तरावर पाच जणांना जाहीर झाले आहेत. तर डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हे विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहे. या सर्व पुरस्कारासाठी रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहेउत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभाग :● सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे● सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक● ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ● मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक

ग्रामीण विभाग-१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव२)बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम३) प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारारंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)१) श्री. धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर

 राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी

विभागस्तरीय पुरस्कार१) अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमान नगर, अकोला, ता.जि. अकोला.

२) छत्रपती संभाजीनगर: श्री. खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली.३) नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौध्दवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे४) पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

५) मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार१) अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा२) छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर३)नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया४)नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक५)पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा.६)मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्गराज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्याअतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..