vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी ठाण्यातील जमीन..

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी ठाण्यातील जमीन..

राज्य प्रतिनिधी –

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.या निर्णयानुसार मौजे कळवा, ता.जि. ठाणे येथील स.नं. 226, क्षेत्र 1-01-90 हे.आर. ही जमीन महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी दिली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे दोन लाख वकीलांसाठी ही संस्था काम करते. वकील वर्गासाठी विविध कल्याणकारी राबविणे, कायद्यातील सुधारणांना उत्तेजन देणे, वकीलांसाठी प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, परिसंवाद आणि परिषदा या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करणे, महिलांसाठी कायदेविषयक शिबिरे आयोजित करणे असे अनेक उपक्रम ही संस्था राबविते. सध्या ही संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील छोट्याशा जागेत कार्यरत आहे. या संस्थेने मागणी केल्यानुसार कळवा येथील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*****

संबंधित पोस्ट

९ फेब्रुवारी – उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस निश्चयाचा महामेरू..बहुत जनांसी आधारु..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शिक्षणाचा उत्सवजिल्हा परिषद शाळा अस्नोली येथे सोहळा उत्साहात पार..

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्याचा निर्णय नागरिकांवर, आजपासून हरकती, सूचना नोंदवता येणार…