vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- शहापूर तालुक्यासारख्या दुर्गम भागात जिथे दळणवळणाच्या सोयी मुबलक प्रमाणात आहेत व वस्ती देखील विखुरलेल्या स्वरूपात आहे, अशा ग्रामीण ठिकाणी लोकांना आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे सहज शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे ग्रामीण यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच बँकेच्या योजनांच्या माहितीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मराठा समाजाचा एकही गरजू घटक योजनेपासून दूर राहू नये, याकरिता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील झपाट्याने काम करीत आहेत. कोकण विभागात लाभार्थी संख्या वाढावी याकरिता आम्ही देखील खेड्यापाड्यात जाऊन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत आहोत, असे विभागीय समन्वयक प्रतीक्षा चव्हाण यांनी सांगितले.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना बँकांकडून कर्जपुरवठा कशाप्रकारे सुलभतेने मिळवता येईल याबद्दल जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर RSETI (rural self employment training institute) याचा कशाप्रकारे जास्तीत जास्त नागरिक लाभ घेऊ शकतात याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर देशमुख, मराठा महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक शुभम शिंदे, संदेश काटकर, संध्या पाटेकर, आकाश सावंत, संदेश पाटेकर व खातिवली, टेंभुर्लि, खराडी, वाशिंद, निमनपाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

 

संबंधित पोस्ट

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

vishwatmaklokswamivarta

न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर