vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे महत्वाचे क्षेत्र-अपर मुख्य सचिव डॉ.विकास खारगे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल दिन कार्यक्रम संपन्न

समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे महत्वाचे क्षेत्र-अपर मुख्य सचिव डॉ.विकास खारगे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल दिन कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.विकास खारगे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ.दत्ता कोहिनकर, आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.विकास खारगे पुढे म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत व कोणती कामे करणार आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक व विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा 15 टक्के वाटा आहे. आपले राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.

ते पुढे म्हणाले की, महसूल विभाग इतर सर्व विभागांच्या समन्वयाने काम करतो. महसूल विभाग शासनाचे प्रतिनिधी आहे. लोकांना न्याय मिळेल अशी विश्वासार्हता निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. महसूल सप्ताह हा केवळ सात दिवसांचा नसून संपूर्ण वर्षभर आपण लोकांना उत्तम दर्जाची सेवा दिली पाहिजे. लोकाभिमुख कामे करणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरुन जनतेला कुठूनही आपली कामे करता येतील. सर्व महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकांची कामे गतिमानतेने होतील, महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल, राज्याची प्रगती होईल, अशी सेवा आपण सर्वांनी मिळून करायाची आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित पोस्ट

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

फास्टट्रॅग चा नवीन पास:आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास फायदा?

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ विषयावरील चित्रकला स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी..

vishwatmaklokswamivarta