vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

*वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

गडचिरोली प्रतिनिधी : जिल्ह्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती गुगल शीटवर तात्काळ अद्ययावत करण्याचे तसेच, या कामासाठी नोडल अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.

नियोजन भवनात आयोजित बैठकीत वृक्ष लागवडीचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज घेतला.

‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. चालू वर्षी ४० लाख वृक्ष लागवड केली जात असून, पुढील वर्षीसाठी ६० लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे.

लागवड केलेल्या वृक्षांचे जतन आणि देखरेख करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, वृक्षांची पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी लागणाऱ्या ६० लाख रोपांची सध्याच्या रोपवाटिकांमधील तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक श्री गोकूल, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे तसेच सर्व जिल्हा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन