vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

ममहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले…

राज्य प्रतिनिधी-राज्यात शिवसेना-मनसे युतीसंदर्भात चर्चा सुरु असून, नेमकं काय होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील वाद उफाळून आला आहे. मनसे शिवसेना युतीच्या बैठकीत गटबाजीचा वाद पुन्हा एकदा समोर आला. वाद इतका वाढला की ठाकरेंच्या नेत्याने बैठकीतून काढता पाय घेतला.

ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात हा वाद झाला. विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. एमडी ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाला अस जयंत दिंडे म्हणाले.. मात्र यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तसं असतं तर गीते यांना एवढे मतदान झालं असते का? असा सवाल विचारला.

विनायक पांडे आणि जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का? असं म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले. विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले.

बैठकीनंतर जयंत दिंडे यांनी सांगितलं की, “आमच्यात काहीच वाद झाला नाही. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. हा गैरसमज पसरवला जात आहे. पांडे का निघून गेले माहिती नाही. मी प्रत्येक भाषणात काही झालं असेल तर माफी मागतो. कृपया गैरसमज पसरवू नका”.

उपनेते दत्ता गायकवाड यांनी म्हटलं की, “हे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भकास झालं. गांजा ड्रग्ज, खून, हनी ट्रॅप बाबत शोध घेतला जात नाही. आम्ही याबाबत वाचा फोडणार, जिल्ह्यात संयुक्त बैठक घेणार आहे. शहरावर अन्याय होतो आहे, त्यावर आमचे दोनच पक्ष लक्ष घालतील. आम्ही राजकारण करत नाही, शिवसेनेचा जन्म राजकारणांसाठी नाही. सामान्य लोकं काय सांगतायत बघा, खड्डामुक्त शहरासाठी आंदोलन केले. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन नाही. 100 पारचा नारा देऊन त्यांना उमेदवार मिळत नाही. काही वाद झाला नाही, गैरसमज निर्माण झाला असेल”.

“किरकोळ वाद झाला. ड्रग्जचाच मुद्दा आता आम्हाला घ्यायचा आहे, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे. भाषणात काय बोलले माहिती नाही, काहीच गैरसमज नाही. आम्ही एकत्र का आलो ? शहराची काय अवस्था झाली आहे. मुंबईत एकत्र आलो तर हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला. आम्ही शहरासाठी एकत्र आलो आहे निवडणूकीसाठी एकत्र आलो नाही,” असंही ते म्हणाले.

मनसे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी सांगितलं की, ” मनसे आणि शिवसेना यांच्यात बैठक झाली. जनतेवर अन्याय होतो त्यावर आमची चर्चा झाली. यापुढे आम्ही मोर्चा काढणार. कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही मोर्चा काढणार. विभाग आणि तालुक्यानुसार आम्ही एकत्रित बैठक घेणार. – एकत्रित मोर्चा काढणार आणि सरकारला जाब विचारणार. आमचे वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी होतील. 15 दिवसानंतर मोर्चा काढून, आमचं सगळं काही एकत्र राहणार असल्याचे सूत्रांकडून कळते

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर