vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम

अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम

        बुलडाणा, प्रतिनिधी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा” या टॅगलाईनखाली अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार आज बुलढाण्यात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनाच्या दिवशी श्री गणेश बिग्गाजी बिकानेर स्वीट मार्ट, जुना अजीसपुर रोड, सागवण, बुलढाणा येथे तपासणी करून वैध अन्न परवाना नसल्याचे आढळले. संबंधित आस्थापनास परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त(अन्न) पी. एस. पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) बी. डी. पावरा, सहकार अधिकारी एम. ए. पोले, अन्नसुरक्षा अधिकारी नि. म. नवलकार व जी. के. वसावे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे उपस्थित होते.

अन्न व्यवसाय चालकांना वैध परवाना घेणे, स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळणे, ताज्या व परवानाधारक विक्रेत्याकडूनच कच्चा माल घेणे, दुग्धजन्य पदार्थ 4°C पेक्षा कमी तापमानात साठवणे आणि जुना किंवा खराब खवा/मावा टाळणे यासारख्या महत्त्वाच्या सूचना विशेष तपासणी मोहिमेदरम्यान देण्यात आल्या. सणासुदीत नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ पुरवावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यवसाय चालकांना केले. तसेच नियमाचे पालन न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा पत्नी यांची बचतगट क्लस्टर योजना

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta