vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये…

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये…

ठाणे प्रतिनिधी प्र- महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण2025/प्र.क्र.92/टिएनटी-1.दि.28फेब्रुवारी 2025 व आयुक्त (शिक्षण), यांच्या जा.क्र.आस्था-क/प्राथ.106/टेट-3/वेप/2025/1191. दि.19 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच हा परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ. दि.21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025” चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि.27 मे 2025 ते 30 मे 2025 व दि.02 जून 2025 ते 05 जून 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. या परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण 2 लाख 11 हजार 308 उमेदवार प्रविष्ठ झाले होते.

शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.106/टिएनटि-1 दि.02 मे 2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा (बी.एड / डी.एल. एड) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुध्दीपत्रक दि.02 मे 2025 च्या अनुषंगाने TAIT 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. तसेच दि.05 ऑगस्ट 2025 रोजी डी.एल.एड. निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. वरील परीक्षेत पात्र उमेद्वारांच्या निकालाच्या अनुषंगाने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025” च्या निकालाची कार्यवाही सुरु आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या / अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 04 आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

 जिल्हा परिषद, ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर; ‘कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत मिळवला गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती

फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta