vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अन्न, नागरी पुरवठा विभाग-राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

अन्न, नागरी पुरवठा विभाग-राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

 

राज्य प्रतिनिधी-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.

या दुकानदारांना केंद्र शासनाकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta