vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

मुंबई:- प्रतिनिधी उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे. गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि 4 जिल्हा परिषद सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत.

आगामी काळात रिपब्लिकन पक्ष उत्तराखंड सहित संपूर्ण उत्तर भारतात विजयी घोडदौड करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. विधानसभा जिंकण्याचा रस्ता हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून असतो. त्यामुळे विधानसभा जिंकून देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंड मधील पुढील वाटचालीसाठी महत्वाचा आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

#RamdasAthawale #election2025 #facebook #meta #AI

संबंधित पोस्ट

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी बडनेरा येथे जमीन

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

पत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर