vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

जालना | प्रतिनिधी-गणेशोत्सव-2025 च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जोपासण्यासाठी श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळ, जालना यांच्या वतीने काल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे तांत्रिक सहकार्य जनकल्याण ब्लड बँक, जालना यांनी केले. शहरातील विविध भागातून युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अवघ्या दोन तासांत तब्बल 32 जणांनी रक्तदान करून समाजहिताचा एक उत्तम आदर्श घालून दिला.

या रक्तदात्यांमध्ये मंडळाचे काही सदस्य, तुळजाभवानी नगरमधील तरुण तसेच 7 महिलांचा समावेश होता. महिलांचा सहभाग हा विशेष उल्लेखनीय ठरला असून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन रक्तदानाचा संदेश दिला.

शिबिराचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. रक्तदानासाठी जनकल्याण ब्लड बँक यांच्या वैद्यकीय टीमने तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून सर्व सुविधा पुरवल्या. रक्तदानापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची सविस्तर आरोग्य तपासणी करून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

या प्रसंगी जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंटयाल, सामाजिक कार्यकर्ते विष्णू पचफुले व विक्रांत ढक्का यांनी मंडळाला भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांची प्रशंसा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढील काळातही सेवा व समाजकार्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.

शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला. “रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या एका पिशवी रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात,” असे प्रतिपादन जनकल्याण ब्लड बँक च्या डॉक्टरांनी केले.

मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, “गणेशोत्सव फक्त धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने रक्तदान शिबिर हा अत्यंत यशस्वी उपक्रम ठरला.” त्यांनी सर्व रक्तदाते, वैद्यकीय कर्मचारी तसेच शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आगामी काळात वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक मदत आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta