vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ मोहीमेंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र. 55 येथे तिरंगा रॅलीचे भव्यतम आयोजन करण्यात आले होते.      याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक विशेष मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंत्री महोदयांनी तसेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे महत्व सांगितले       तिरंगा रॅली प्रसंगी माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, शिक्षण उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे, सहा.आयुक्त श्री. उत्तम खरात, स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल खरसंबळे व श्रीम.स्नेहल विशे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 अशाच प्रकारे सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालय परिसरातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेलापूरगाव येथील नमुंमपा शाळा क्र.01 चे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व शिक्षण अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे आणि स्वच्छता अधिकारी व निरीक्षक उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयात प्रदर्शित केलेल्या तिरंगा प्रदर्शनाला भेट देऊन तिरंगा ध्वजाचा प्रवास जाणून घेतला.     तिरंगा रॅलीमध्ये ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ अशा विविध घोषणा देत व विविध घोषणांचे फलक उंचावत, तिरंगी झेंडे फडकवत विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीचा प्रसार केला.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड