vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे धोरण आहे. रुग्णांना उपचार सुविधा देण्यात शासनासोबतच खाजगी संस्थांचाही सहभाग आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

 येथील कर्नावट कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे,आ. अब्दुल सत्तार, डॉ. विनय कर्नावट, डॉ. मधुबाला कर्नावट, डॉ.आनंद, डॉ. सोहम आणि डॉ. खुशबु कर्नावट यावेळी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कर्करोग या आजाराचे वेळीच निदान आणि लगेच उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कर्करोग रुग्णालयांचा मुंबई पुणे सोडून अन्य शहरात उपयोग होतो. चांगले दर्जेदार उपचार दिले जातात. युवकांनी व्यसनांपासून दुर रहावे. म्हणजे कॅन्सर सारखा आजारही आपल्यापासून दुर राहतो. कॅन्सरवरील उपचारांबाबत संशोधन होत असतांना कॅन्सर होऊ नये यासाठी आपण सगळ्यांची काळजी घेणे आपल्या दैनंदिन जीवनमानात, आहारात बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ**अधिक माहितीकरिता खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in/ वर भेट द्यावी*

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न