vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

नवी दिल्ली, प्रतिनिधी लाल किल्ल्यावर झालेल्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या परेडमध्ये महाराष्ट्राची मुलगी लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथक प्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली.

 मूळच्या नागपूरच्या असलेल्या जुई भोपे यांनी २०१५ साली भारतीय नौदलात प्रवेश केला असून सध्या त्या लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला.

मागील वर्षी झालेल्या गणराज्य दिन परेडमध्येही जुई भोपे यांनी भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व केले होते. त्यांचे शिक्षण नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमध्ये झाले असून, पुढे रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाल्याने लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा, आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांची कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta