vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, घरे पूर्णपणे बाधित किंवा अंशतः बाधित झाल्यास त्याचेही तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी. तसेच टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी. ही मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठीही शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आहरित करण्यास शासनाने या पूर्वीच परवानगी दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन ते तीन दिवसा पासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना तात्काळ मदत मिळावी, त्यांना दिलासा देण्याचे प्रशासनाने काम करावे. तसेच या बाधितांना शासन निकषानुसार मदत करावी, असे निर्देशही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

संबंधित पोस्ट

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

भारतीय रेल्वे बसवणार आधुनिक कंपोझिट स्लीपर्स एआयच्या मदतीने ट्रॅकची देखरेख आणखी सुधारणार

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप

मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी केवायसी करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध