vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

सातारा, प्रतिनिधी :जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा श्रीमती सुरेखा कोसमकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय,मुंबई यांचे आदेशान्वये यशोदा पॉलिटेक्नीक व इंजिनिअरिंग कॉलेज सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता रॅगिंग प्रतिबंधित कायदा, ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करीबाबत कायदा, नालसा योजना, वाहतूकीचे नियम व महिलांची सुरक्षा व कायदा या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये सचिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण निना बेदरकर यानी कायदेशीर मदत, नालसा मालसाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चौथे सहदिवाणी न्यायाधीश रितेश मावतवाल यांनी रॅगिंग प्रतिबंध कायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे यांनी ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन या विषयी माहिती सांगितली. एपीआय अभिजीत यादव यांनी वाहतुकीचे नियम याविषयावर मार्गदर्शन केले.ॲड मनिषा बर्गे मध्यस्थी विधी सेवा प्राधिकरण यांनी महिलांची सुरक्षा व कायदा याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव निना बेदरकर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश रितेश मावतवाल, किशोर काळोखे, एपीआय अभिजीत यादव,ॲड मनिषा बर्गे मध्यस्थी विधी सेवा प्राधिकरण आदी उपस्थित होते.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा* 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त धारावीत भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.जिल्हा न्यायालय ; तालुका न्यायालयांमध्ये होणार आयोजन 

vishwatmaklokswamivarta