vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

रायगड प्रतिनिधी- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने) अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी लागू केली आहे.

दि.23 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजेपासून ते दि.28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23.00 वाजेपर्यंत, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यत आणि दि. 02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यंत तसेच दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 नंतर ते दि. 07 सप्टेंबर 2025 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने)यांची वाहतुक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, मेडीसीन, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन, अन्न-धान्य, भाजी-पाला, नाशवंत माल इ. जीवन आवश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रुंदीकरण/रस्ता दुरुस्ती कामकाज इ. साठी लागणारे साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. मात्र या संदर्भात वाहतूकदारांनी संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घ्यावे असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

००००००००

संबंधित पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ,कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली