vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

रायगड( प्रतिनिधी:- आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे जिल्हा उद्योग केंद्र रायगड व लघु उद्योग भारती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत उद्योग सुसंवाद-2025 या कार्यक्रमाचे सकाळी 11.00 वा आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, उद्योजक यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षकअ आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले आयुक्त, पनवेल महानगर पालिका, मंगेश चितळे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया तसेच जिल्ह्यातील सुमारे 300-400 उद्योजक उपस्थितीत राहणार आहेत. शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.पनवेल येथे “हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी 10.00 वा. आणि जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक सकाळी 10:30 वा. होणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी…

राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन                                               

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत