vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती…

 

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून सुशीलकुमार लोहानी, आयएएस (ओडिशा कॅडर : १९९५), अतिरिक्त सचिव, पंचायती राज मंत्रालय आणि डी. आनंदन, आयएएस (सिक्कीम कॅडर : २०००), अतिरिक्त सचिव, वित्त मंत्रालय (व्यय विभाग) यांची नियुक्ती केली आहे.

याशिवाय, नितीनकुमार शिवदास खाडे, आयएएस (आसाम-मेघालय कॅडर : २००४), संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय (भूमी संसाधन विभाग) यांना राखीव यादीत स्थान देण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीचे संपूर्ण आयोजन पारदर्शक आणि सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

नाशिक येथे महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

vishwatmaklokswamivarta

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta