vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या,

फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानीविषयी परिस्थिती कृषी मंत्री श्री. कोकाटे यांच्या निदर्शनास आणून देत मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले की, या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही. कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजन करण्याचे आदेश डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनास दिले आहेत. तसेच याविषयी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनही यावेळी देण्यात आल्या.0000

संबंधित पोस्ट

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 25 मे अखेर 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा64 गावे व 230 वाड्यांतील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना दिलासा

ग्रामपंचायत सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta