vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

 

मुंबई प्रतिनिधी-रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले आहे.

91 वर्षीय कोकिलाबेन यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले असून त्यांना कलिना विमानतळावर पाहण्यात आले आहे. यावेळी अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे चिंतेत पाहायला मिळाले.

मुकेश अंबानीदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र अद्याप अंबानी कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसंच, हॉस्टिपलकडूनही कोणते बुलेटिन जारी करण्यात आले नाहीये. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वाढत्या वयोमानामुळं वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र कुटुंबाकडून अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न,कोकिलोबेन अंबानी यांचे 1955 साली धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार मुलं असून मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांच्या मुलाची नावं आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अँटिलियामध्ये राहतात.

संबंधित पोस्ट

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी

वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत सामूहिक गायनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन 

सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम,मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस