vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर रहावे,असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शिरसाट यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. बैठकीस खासदार डॉ.भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेचे आयुक्त जी .श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके , निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर ,महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे यांच्यासह आरोग्य यंत्रणातील संबंधित अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण 81 रुग्णालय हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या उपचारासाठी संलगनीत असून या योजनेचा लाभ गरजू रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येतो. रुग्णालयाने विविध कागदपत्राच्या अभावी रुग्णास वेठीस धरू नये. आलेल्या रुग्णास वेळेत उपचार करून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले .संबंधित नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारी गैरसोयी टाळावी.त्याचप्रमाणे रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ई केवायसी करून घ्यावी.सेतू सुविधा केंद्र,आशाताई, व स्वस्त धान्य दुकानदार यांचे सहकार्य करून ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नागरिकांना केले . यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार आणि अशा अंगणवाडी सेविका यांना सूचित करण्याचे निर्देश दिले.

महसूल व कृषी विभागाचा आढावा

जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ याबाबतची मदत मिळवून द्यावी. यासाठी कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करून प्रक्रिया पूर्ण करावी .ज्या गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेलेले आहेत. तेथे उपाययोजना करून सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना वेळेत मदत करण्यात कृषी विभाग आणि महसूल विभागाने कुचराई करू नये. शेतीचे नुकसान पाहणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतीवरच्या बांधावर जाऊन पाहावे व त्याचे योग्य निरीक्षण पंचनाम्यात नोंदवावीत जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळण्यास मदत होईल असे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा* *विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना–राज्यपाल जिष्णुदेव वर्मा*

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट