vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार..

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार..

मुंबई, प्रतिनिधी : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावा, उत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यासाठी हे महाविद्यालय महत्वाचे असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, सध्या अस्तित्वातील इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्यावैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही वेगाने करावी. महाविद्यालयाचा आराखडा तयार करून, कार्यवाही करावी

मराठवाडा विभागातील लोकसंख्येसाठी ही वैद्यकीय सुविधा म्हणजे एक मोठा दिलासा ठरणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन-राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उद्घाटन…