vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.

हॉटेल व लॉज तपासणी सुरू राहणार…*लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.

 राज्य प्रतिनिधी शिर्डी-बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो.

लैंगिक अत्याचारातील याच कायद्यातील काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक,कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असते. अशी स्पष्ट मत श्रीरामपूर विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

   या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दोन्हीही लॉज /हॉटेल चालक यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे. श्रीरामपूर विभागात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी श्रीरामपूर यांच्या अंतर्गत एकूण 17 पोलीस स्टेशन येतात. या सतरा पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराखालील दाखल व तपासावर असणाऱ्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. याची सगळी चौकशी करून यामध्ये जर कोणी हॉटेल/ लॉज चालक, मालक याने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आपले हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिला असेल तर त्यांना देखील गुन्ह्यांमध्ये सह आरोपी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलेआहे.

  तसेच यापुढे अशा स्वरूपाच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जर हॉटेल किंवा लॉजचा,कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित हॉटेल चालक-मालक, कॅफे चालक -मालक, लॉज चालक-मालक यांना देखील सह आरोपी करण्यात येईल.

श्रीरामपूर विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे हे नगर जिल्ह्यातील शिर्डी. श्रीरामपूर. संगमनेर अकोले असेच विविध तालुक्यात आपल्या पदाची विविध जबाबदारी योग्य रीतीने हाथळून अनेक अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम केले. अनेक तालुक्यात दंगलग्रस्त भागातही त्यांनी सामाजिक एकोपा घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याचा त्यांचा गुन्हेगारीवरचा अभ्यास तगडा असून. कायद्याला कायम श्रेष्ठ मानणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे

  त्या मुळे सर्वच हॉटेल लॉज चालकांना सूचित करण्यात येते की आपल्या हॉटेलमध्ये, लॉज मध्ये येणाऱ्या व्यक्तींची विहित नमुन्यातील रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी.त्यांच्या वयाची पडताळणी करावी व यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा. किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल…

श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर,लोणी, कोपरगाव,सोनई त्याचप्रमाणे अन्य शहरांमध्ये मोठी शैक्षणिक संकुले आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून मुले मुली शिक्षणासाठी येत असतात. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील प्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आपले लॉज,हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर,मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे… गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. असे शेवटी त्यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डी.पी. याबाबत महावितरणने,जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार,मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पणमुंबई उपनगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ३८ नवीन सब स्टेशन उभारणी, वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करावीत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर