vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात घर, दुकान, फ्लॅट भाड्याने दिल्यास माहिती पोलीसांना देणे बंधनकार

जिल्ह्यात घर, दुकान, फ्लॅट भाड्याने दिल्यास माहिती पोलीसांना देणे बंधनकार

रायगड, प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांनी आपली घरे, दुकाने, फ्लॅट, फार्म हाऊस भाड्याने देताना किंवा विक्री करताना भाडेकरू व खरेदीदारांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, फार्म हाऊस व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणास्तव राहण्यासाठी घरे व फ्लॅट भाड्याने घेत आहेत. परंतु, याबाबत मालकांकडून स्थानिक पोलीस ठाण्यात वेळेवर माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवाया घडल्यास तपासात अडथळे निर्माण होतात.

यापूर्वीही रायगड परिसरातून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नक्षलवाद्यांना अटक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घातपाती कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक भाडेकरू किंवा खरेदीदाराची माहिती पोलीस स्टेशनकडे असणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नवीन आदेशानुसार मालमत्ता धारकांनी भाडेकरू अथवा खरेदीदार यांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक, ओळखपत्र व इतर संपूर्ण माहिती भाडेकरार किंवा विक्री झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असेल. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अंतर्गत दंडनीय कारवाई होणार आहे.

हा आदेश २६ ऑगस्टपासून पुढील दोन महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व कायद्याच्या अधीन राहून आवश्यक ती माहिती पोलीस ठाण्यात नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडीलयोजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली,शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ..शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा

बार्टीचे पाच विद्यार्थी-केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या असिस्टंट कमांडंट पदी..

शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑलिम्पिक डे साजरा करण्याचे आवाहन