vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

राज्य प्रतिनिधी

मुंबई, : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता.

यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

वाळवा तालुक्यात 46.2 मि.मी. पावसाची नोंद

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 1.50 लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण**कार्यालयीन स्वच्छता व सुयोग्य अभिलेख जतन पध्दतीवर भर*

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावतीजिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित  15 मार्चपर्यंत मुदत