vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात

स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

जालना/प्रतिनिधी,करण पाटील जाधव मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महालक्ष्मी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. संजयनगर, शंकरनगर, निळकंठनगर, छत्रपती कॉलनी, भवानी नगर, सिध्दिविनायक नगर, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क, सावरकर गल्ली, मिल्लत नगर, झेडपी क्वार्टर, रमाबाई नगर या भागात श्री महालक्ष्मी साजसजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या पाच वर्षापासून करण पाटील जाधव मित्र मंडळाच्यावतीने सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या पाचव्या वर्षी जवळपास दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस स्मार्ट टीव्ही व सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस गॅस शेगडी व सन्मान चिन्ह, तृतीय बक्षीस कुलर व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पाच बक्षिसे व पाच कुपन मोहनराव इंगळे यांचे हॉटेल सनराईज सहभागी स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक करण पाटील जाधव यांच्या वतीने देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ॲड. अश्विनी धन्नावत, ॲड. पिंकी लड्डा, ॲड. आहुती विजय सेनानी यांनी काम पाहिले. यावेळी स्पर्धकांनी विविध देखावे, पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा, मराठा आरक्षण देखावे सादरीकरण केले. यावेळी बंडू काळे, विठ्ठल देवकाते, राहुल गुंजकर, रोहित जाधव, स्वप्निल मोताळे, प्रतीक चिखले, गजानन लुटे व धीरज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

शतायुषी शिक्षणव्रतीचा गौरव–ग्रंथतुला आणि धान्यतुला करून जपली सामाजिक बांधिलकी…

एमएसआरडीसी’चे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक; हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण