vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ…

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ…

ठाणे, प्रतिनिधी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शिबीर कार्यालय 1. अंबरनाथ, 2. बदलापूर व 3. मुरबाड अशी एकूण तीन शिबीर कार्यालये येत असून या कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) विषयक कामकाज केले जाते.

शिबीर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) बाबत अपॉईन्टमेंट मिळत नसल्याने जनतेची गैरसोय होते व लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता शिबीर कार्यालये कमी पडत असून शिबीर कार्यालयात वाढ करणे आवश्यक असल्याने शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आली आहे.शिबीर कार्यालयाचे नियोजन पुढीलप्रमाणे:-शिबीर कार्यालय क्र.1 – शिबीर कार्यालयाचे ठिकाण- अंबरनाथ, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी.

शिबीर कार्यालय क्र.2 – शिबीर कार्यालयाचे ठिकाण- बदलापूर, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक सोमवार व गुरुवारी.शिबीर कार्यालय क्र.3 – शिबीर कार्यालयाचे ठिकाण- मुरबाड, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी.जनतेचे हिताकरिता शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आल्याचे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय,बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ संप मागे घेत असल्याचे कृती समितीने केले जाहीर..

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन