vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- सन २०२६ मध्ये शांघाय येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे. जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांनी आपल्याकडील प्रतिभासंपन्न उमेदवारांचे नामांकन करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक कौशल्य विकास स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी आयोजीत केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाय येथे होणार आहे. याकरीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. त्याकरीता जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे-

१. वयोमर्यादा हा एकमेव निकष. २. किमान १६ वर्षे व जास्तीत जास्त दि. १ जानेवारी, २००४ किंवा तद्नंतरचा जन्म दिनांक असणे अनिवार्य. ३. ६३ विविध कौशल्य क्षेत्रांसाठी स्पर्धा आयोजित.४. स्पर्धेतील सहभागासाठी उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवुन दि. ३०.०९.२०२५ पर्यंत नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा.जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकिय व खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमई टूल रूम्स, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, इतर सर्व प्रशिक्षण संस्था यांनी विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य रोजगार व उद्योजकता, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप : भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत -आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

भारताने मेरठ येथील आरव्हीसी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे रोगमुक्त क्षेत्र केले स्थापन

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta