vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एकही पैसा परत जाता कामा नये. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, यंत्रेणेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा चांगला वापर करणे गरजेचे आहे. काम झालेल्या ठिकाणांचे जिओ टॅगींग छायाचित्रे सादर करावेत. काम अपूर्ण राहिले असल्यास त्याची इत्यंभूत माहिती घेवून बैठकीस हजर राहणे आवश्यक आहे. निधी दिल्यानंतर वेळेत निधी खर्च व्हायला पाहिजे. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम करण्यासाठी नेहमी उत्साही रहावे. तसेच चुकीची कामे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत त्यामुळे नियमानूसार कामे वेळेत करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सन 2024-25 खर्चाचा आढावा, सन 2025-26 नियोजनाबाबत, अखर्चित निधीबाबत माहिती, स्पिल कामांच्या याद्या व आवश्यक निधी , सन 2024-25 पर्यंत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आता प्रत्येक कामांना युनिक आयडी देण्यात येणार असल्याचेही नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.      

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

लोकांनी आपले हक्क स्वतःहून राबवून घ्यावेत – न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी**देसाईगंज येथे विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात*

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली*

vishwatmaklokswamivarta