vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

     अमरावती, प्रतिनिधी भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

   पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे राज्यातील युवक व युवतींसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.62 आयोजित करण्यात आले आहे. कोर्स कालाबधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

    जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील एसएसबी 62 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन आणि ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे

     सदर एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीची पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावे. कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसीचे सी सर्टिफीकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टर्सने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेशप्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

     याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ई-मेल आयडी training.petenasik@gmail.com व दुरध्वनी क्र 0253 -2451032 किंवा व्हॉटस्अप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

आमदार अर्जुनराव खोतकर यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार..

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे

शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा..

vishwatmaklokswamivarta

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील