vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा,  पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या  पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा  या विषयावर परिसंवादाचे आयोजन..

राज्य प्रतिनिधी – करदाता सेवा महासंचालनालयाच्या मुंबई विभागीय शाखेच्या वतीने 11 सप्टेंबर 2025 रोजी वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावरच्या वेबिनार – परिसंवादाचे आयोजन केले होते

पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला गेला.

करदाता सेवा महासंचालनालयाच्या, मुंबई विभागीय शाखेचे अतिरिक्त प्रधान महासंचालक सुमित कुमार यांनी या परिसंवादासाठी उपस्थितांशी संवाद साधला. वस्तू आणि सेवा करातील आगामी बदलांबद्दल संबंधितांना जागरूक करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यासोबतच पुण्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पुण्यातील पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेने हा उपक्रम आयोजित करण्यासाठी दिलेल्या सहकार्याचीही त्यांनी प्रशंसा केली. करदात्यांमधील जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा वचनबद्ध असल्याचेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.परिसंवादाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा करातील प्रस्तावित सुधारणांवर सखोल चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले. या उपक्रमामुळे करदात्यांसह व्यावसायिक तज्ञांमधील जागरूकता वाढण्यासाठी मदत झाली, तसेच भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या भविष्याच्या दृष्टीने सज्जतेचीही सुनिश्चित झाली. व्यापार क्षेत्र, उद्योग प्रतिनिधी, व्यावसायिक तज्ञ, विद्यार्थी तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांसह 200 पेक्षा जास्त जण यामध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने विविध विषय तज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तू आणि सेवा कर 2.0 चे नवीन पैलू, अपेक्षित सुधारणा, तंत्रज्ञानावर आधारलेले बदल आणि बदलत्या अनुपालन प्रणालीविषयीची आपापली मते आणि विचार मांडले.

प्रत्येक करदात्याच्या, ग्राहकाच्या, व्यापारी गटांच्या आणि विद्यापीठांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे, करदात्यांमधील जागरुकतेच्या अनुषंगाने आवश्यक गरजा पूर्ण करणे तसेच वस्तू आणि सेवा कर 2.0 सारख्या सरकारी सुधारणांची प्रसिद्धी करणे यासाठी करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा नियमितपणे प्रचार प्रसार विषयक कार्यक्रम आणि जागरूकता मोहिमांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे.

संबंधित पोस्ट

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अपीलकर्त्याच्या गैरवर्तणुकीमुळे तीन वर्षे सुनावणीस बंदी-राज्य माहिती आयुक्तांचे आदेश

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीचा इशारा : नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta