vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत असलेल्या क्रीडा गुणांना प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून देऊन भविष्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणून शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांला अनन्य साधारण महत्व आहे. याच दृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत विविध खेळांकरिता स्वतंत्र धोरण निश्चित करुन खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. जेणेकरून या स्पर्धेतील सर्वोत्तम गुणवंत खेळाडू व संघ थेट विभागीय व त्यानंतर राज्य स्तरावर खेळू शकतात.

     या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने ‘नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” क्रीडा स्पर्धा 2025-26’ महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ जिमखाना येथे उत्साहात संपन्न झाल्या.

  स्पर्धेचा अनौपचारिक शुभारंभ नेरुळ जिमखान्याचे उपाध्यक्ष श्री. किरण स्टॅनली, व्यवस्थापन समिती सदस्य व लॉन टेनिस समन्वयक श्री. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते, महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रशिक्षक, शालेय खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  या लॉन टेनिस स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून 14, 17 व 19 वर्षाआतील मुलांच्या गटात 47 खेळाडू आणि मुलींच्या गटात 59 खेळाडू असे एकुण 106 खेळाडू सहभागी झाले होते. लॉन टेनिस हा खेळ जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय असून यामध्ये सर्वाधिक रक्कमेची पारितोषिके असलेल्या मानांकित स्पर्धा होत असतात. मागील काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात लॉन टेनीस खेळासाठी पोषक वातावरण तयार होत असून त्याच्या परिणामी या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

  स्पर्धेमध्ये मुलांच्या 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – अभिनव शर्मा, दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ, व्दितीय क्रमांक – पियुष रेड्डी दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ, तृतीय क्रमांक- अझलान इब्राहिम शरीफ – पोद्दार इंटरनॅशनल केंब्रिज स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक – समर समाधान पाटील, फा.ॲग्नल स्कुल वाशी आणि पाचवा क्रमांक – प्रताप लक्ष्मण म्हस्के, पोद्दार इंटरनॅशनल केंब्रिज स्कुल नेरुळ यांनी पटकाविला आहे.

  मुलांच्या 17 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – ऋषीकेश प्रविण माने, सेंट मेरीज आयसीआयसी स्कुल कोपरखैरणे, व्दितीय क्रमांक – ध्येय शांडिल्य, पोद्दार इंटरनॅशनल सीबीएसई स्कुल नेरुळ, तृतीय क्रमांक – आयुष्य अतुल घाडगे, अमेटी इंटरनॅशनल स्कुल, बेलापूर, चतुर्थ क्रमांक – कैरव पांडे, अमेटी इंटरनॅशनल स्कुल बेलापूर, पाचवा क्रमांक – पवनकुमार परमेश्वर माशाळे, सेंट झेवियर्स हायस्कूल नेरुळ यांनी संपादन केला.

 मुलांच्या 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक -एस.के.पार्थव पेढापती,दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ, व्दितीय क्रमांक -अथर्व बंगरगी, फा. ॲग्नल स्कुल वाशी यांनी मिळविला.

  स्पर्धेमध्ये मुलींच्या 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – रुमी गाडीया, साधू वासवानी स्कुल सानपाडा, व्दितीय क्रमांक -सुक्रीती, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई) नेरुळ, तृतीय क्रमांक- गीत रतिकांत पांडा, ए.पी.जे. स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक – रिया बासू , डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल नेरुळ, पाचवा क्रमांक – रेणुका परमेश्वर माशाळे, सेंट झेवियर्स हायस्कूल, नेरुळ यांनी पटकाविला.

  तसेच मुलींच्या 17 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – रिद्धी गामी, फा.ॲग्नल स्कुल वाशी, व्दितीय क्रमांक – शेहजान शाहबुध्दीन शेख, लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कुल कोपरखैरणे, तृतीय क्रमांक – दिशीका जैन, ए.पी.जे. स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक – सान्वी अरोरा, ए.पी.जे.स्कुल नेरुळ, पाचवा क्रमांक – वगिशा वशिष्ठा, अमेटी इंटरनॅशनल स्कुल बेलापूर यांनी संपादन केला.

    मुलींच्या 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – शेरीना रॉड्रिक्स, सेंट मेरीज आयसीआयसी स्कुल कोपरखैरणे, व्दितीय क्रमांक – इशा गिरीश मोहिते, वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स सानपाडा, तृतीय क्रमांक- जोशमी मंडल, डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कुल नेरुळ. चौथा क्रमांक – सिया वासुदेव तोंडवळकर, युरो स्कुल ऐरोली, पाचवा क्रमांक- तिवशा सुमित ढाल, ए.पी.जे.स्कूल नेरुळ यांनी प्राप्त केला आहे.

     हे गुणवत्तापूर्ण यश संपादन करणारे खेळाडू पुढील मुंबई विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. या स्पर्धा आयोजनासाठी राष्ट्रीय लॉन टेनिस प्रशिक्षक श्री. अश्विथ अवस्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणजे यावर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने वाढता सहभाग दिसून येत आहे.

    या जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये 93 संघांचा उत्स्फुर्त उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित