vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

जालना,प्रतिनिधी)-देशात पहेलगाम येथील निरापराध पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करुन अनेक भगिनींच्या कपळावरील कुंकू पुसरणार्‍या व अतिरेक्यांना पोसणार्‍या देशासोबत केंद्र शासनाने नुकतीच क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली. यावरुन मोंदी सरकारला पहेलगाम येथील भगिनींच्या कुंकूंवाचा विसर पडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जालन्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने `माझं कुकूं माझा देश’ हे आंदोलन करुन कुंकूवांच्या पेट्या जमाकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविण्यात आल्या.आजचे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर यांच्या नेतृत्वात शहरातील गांधीचमन येथे करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व मोदी विरोधात घोषणाबाजी केली व मोंदी सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अशी जोरदार मागणी केली.यावेळी माजी नगरसेविका गंगुबाई वानखेडे, मंजुषा घायाळ, स्वाती खांडेभराड,द्वारकाबाई तोंडुळे, सुशीला लवटे, सीताबाई राऊत, शिवकन्या राऊत, लक्ष्मीबाई राऊत, अनुसया काळे, माधुरी वाघमारे, वर्षा नागवे, पार्वती वाघमारे, नंदा नागवे, शकुंतला खांडेभराड, मिना कंकाळ, अंजना घोडके, आशा लांबे, माधुरी टापरे, संगीता पवार, सखुबाई पवार, जिजाबाई हरणे, कांताबाई सोळुंके, लक्ष्मीबाई काटकर, आशा सुरुशे, आशाबाई आगलावे, सरस्वती मिरकर,कलाबाई दसपुते, शशिकला निहाळ, राधाबाई मते, राणी लांबे, रुख्मिणी आगलावे,ज्योती चाकुटे यांच्यासह आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

०००००००००००

फोटो अ‍ोळी……११-जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन महिलाआघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर, गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळयांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील गांधीचमन येथे करण्यात आले.

संबंधित पोस्ट

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई § डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात..