vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

 रायगड( प्रतिनिधी:- राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. या महामंडळामार्फत, छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगारांकरीता रू. 1.00 लक्षची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना राबविण्यात येते तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु 15.00 लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्षपर्यंत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना या योजना राबविण्यात येतात.

थेट कर्ज योजना व 20 टक्के बीजभांडवल कर्ज योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, गटकर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना या योजनांकरीता महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

इच्छुक, गरजु इ.मा.व. (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनांच्या अधिक माहिती करीता शामराव पेजे कोकण इतर मागास वर्गआर्थिक विकास महामंडळ लि. चे जिल्हा कार्यालय:-श्रीरामसमर्थ गृहनिर्माण संस्थामर्या., सदनिका क्र. 101, पहिला मजला, चेंढरे, पो. अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड, दुरध्वनी क्रमांक 02141-224448 वा Email -dmobcalibagraigad@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेत स्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta