vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

           राज्य प्रतिनिधी- जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर महिलाही उद्योग सुरू करू शकतात. मिरज तालुक्यातील बेडग येथील भाग्यश्री सुतार यांनी टीचिंग लाईनचा अनुभव असूनही उद्योजकतेकडे पावले वळवली आणि त्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास सुरू झाला आहे.

      भाग्यश्री यांचे माहेर लातूर. डी. एड्. चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लग्नापूर्वी तिथे शिक्षिका म्हणून काम केले. 2016 साली लग्न झाल्यानंतर एकत्र कुटुंबात गृहिणीची जबाबदारी पार पाडताना उच्चशिक्षित भाग्यश्रींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. पती श्रीकांत सुतार हे कुपवाड एमआयडीसी मध्ये प्लास्टीक उत्पादनाचा झाडूचे हॅण्डल, शेती औषधाच्या बॉटल्स तयार करण्याचा उद्योग चालवत होते. ते पाहून त्यांनाही याच उद्योगात पण स्वतंत्रपणे आपला व्यवसाय उभारण्याची ओढ लागली. त्यातून त्यांनी 2023 साली जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्जप्रस्ताव सादर केला. या योजनेतून त्यांना 21 लाख 73 हजार रूपये कर्ज मिळाले. इथून त्यांची उद्योजिका म्हणून वाटचाल सुरू झाली.

 त्यांनी लगेचच कुपवाड एमआयडीसी येथेच मुलीच्या नावे गिरीजा इंडस्ट्रीजची स्थापना केली. पती व एकत्रित कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंबा होताच. भाग्यश्रीताईंचीही कष्ट करण्याची तयारी होती. पतींच्या अनुभवातून आणि मिळालेल्या प्रशिक्षणातून त्या शिकत गेल्या. मिळालेल्या कर्जातून त्यांनी ब्रूम हँडल करण्याची मशिन घेतली. या यंत्रातून ताशी 330 पीस ब्रूम हँडल तयार होतात.

      याबाबत भाग्यश्री सुतार म्हणाल्या, मला पूर्वीपासूनच नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याची इच्छा होती. प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारी प्रेरणा व बळ मिळाले. आज आमची उत्पादने सांगली जिल्हा, महाराष्ट्राबरोबरच परराज्यातही विक्री केली जातात

  भाग्यश्री सुतार यांच्या यशस्वी उद्यमशीलतेमुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळत आहे. चिकाटी, आत्मविश्वास आणि शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग केला, तर महिलाही मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांमध्ये पुढे जाऊन यश मिळवू शकतात, याचे हे एक उदाहरण आहे.

    – संप्रदा बीडकर,

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

हवा गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाहीवर भर देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत