vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

             मुंबई, प्रतिनिधी: मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवाचे सर्वसमावेशक स्वरूप लक्षात घेवून आयोजनाबाबत महसूल, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, नगरविकास विभाग आणि महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने या महोत्सवाची आखणी करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात मेघदूत येथे बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, नृत्येश्वर फाउंडेशन ऑफ आर्ट कल्चर संस्थेचे शंशिकांत मेस्त्री उपस्थित होते.

      पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मे.नृत्येश्वर फाउंडेशन ऑफ आर्ट कल्चर या संस्थेव्दारे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लोकनृत्य महोत्सव साजरा करण्याबाबत सर्व विभागांचा समावेश असणे आवश्यक आहे.त्यासाठी संबधित सर्व यंत्रणांचा सहभाग महत्वाचा आहे. या महोत्सवासाठी निधीची तरतुद, विभागांचा यामधील सहभाग यादृष्टीने समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

*****

संबंधित पोस्ट

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन